पुणे पारा दहा अंशांखाली पुढील तीन ते चार दिवस राज्यात कडाका आणखी वाढणार
1 min read
पुणे दि.२७:- शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढत असून, शहरातील एनडीए आणि हवेली तालुका हद्दीत थंडीचा पारा दहा अंशांखाली नोंदवला गेला. मंगळवारी पहाटे या परिसरात ९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाल्याने हुडहुडी भरणारी थंडी होती.राज्यात सध्या महाबळेश्वरपेक्षा पुणे,अहिल्यानगर,नाशिक यासह विदर्भातील काही जिल्ह्यातील थंडीचा पारा खाली आला आहे. दरम्यान, पुणे शहरासह जिल्ह्यात गेल्या २४ तासांत धुकेही मोठ्या प्रमाणात पसरले होते. दुपारीही गारवा जाणवत होता. तसेच माळीण, शिवाजीनगर, आंबेगाव, तळेगाव आणि दौंड भागांत किमान तापमान १० अंशांपर्यंत नोंदविले गेले.
पुढील तीन ते चार दिवस शहरासह राज्यात परिसर आणि किमान तापमान (अंश से.) हवेली – ९.५, एनडीए – ९.६, तळेगाव – १०.३, शिवाजीनगर आणि आंबेगाव- १०.८, माळीण- १०.९, पाषाण- ११.३, शिरूर – ११.५, बारामती – ११.७, इंदापूर- १२, पुरंदर- १२.४, हडपसर- १३.३. थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.