लोकसभेला ‘कांदा’ तर विधानसभेला ‘लाडक्या बहिणी’ ठरल्या गेम चेंजर
1 min read
पुणे दि.२४:- महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या या निवडणुकीमध्ये कांदा हा गेम चेंजर ठरला व महविकास आघाडीला चांगले यश मिळाले. त्यामुळे महायुतीने चार महिन्यांमध्ये विविध योजना आणल्या. त्यामध्ये सर्वात लोकप्रिय ठरलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही विधानसभेला गेम चेंजर ठरली व महायुतीला मताधिक्य वाढले. विधानसभेला राज्यात मतदानाची टक्केवारी वाढली. त्यात महिलांची मतदानाची टक्केवारी वाढली. त्यामुळे वाढलेल्या टक्केवारीचा फायदा भाजपाला होईल असा अंदाज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मतदानानंतर केला होता.त्यांचा हा अंदाज खरा ठरला.
२३ तारखेच्या निकालावरून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत येणार हे स्पष्ट झाले आहे. मविआला भुईसपाट करणाऱ्या या निकालाचे श्रेय ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने महिला मतदारांना आनंदी करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. ही योजना जुलै महिन्यापासून लागू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.
पहिल्या टप्प्यात ३१ जुलैच्या आधी अर्ज केलेल्या महिलांच्या बँक खात्यावर ही रक्कम थेट जमा झाली. जुलै-ऑगस्ट असे दोन महिन्यांचे पैसे महिलांना देण्यात आले. रक्षाबंधनाच्या काही दिवासांआधीच ही योजना सुरू करण्यात आली. त्यामुळे महिलांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच पैसे देत असल्याचे वाटू लागले.
त्यानंतर काहींना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे ४५०० रुपये देण्यात आले. परिणामी, महिलावर्गात आनंदाचे वातावरण पसरले. पण लाडकी बहीण योजनेचे पैसे शिंदेमुळे मिळाल्याचा विश्वास महिलांमध्ये उत्पन्न झाला. यादरम्यान महिला मतदारांचा प्रतिसाद पाहता महायुतीच्या नेत्यांमध्ये लाडकी बहीण योजनेवरून श्रेयवादाची रस्सीखेच सुरू झाल्याचेही पाहायला मिळाले.
महिलांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कार्यक्रम, मेळावे घेत महिलांशी सेलिब्रीटी स्टाईल हस्तांदोलन करत त्यांना लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार असे आश्वस्त केले. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांचा देवाभाऊ झाला.
तर, अजित पवारांचा दादा झाला. यामुळे लाडकी बहीण योजना फसवी ती बंद होणार अशा विरोधकांनी केलेल्या विधानांचा महिलांवर परिणाम झाला नाही.चौकट योजना बंद होणार म्हणणाऱ्या महावीकास आघाडीने वचन नाम्यात रक्कम वाढवली महाविकास आघाडीने लाडक्या बहिणी योजनेला विरोध केला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की बँकेतले पैसे काढून घ्या परत घेतील. तर योजना बंद होईल, १५०० रुपयांत काय येत. विविध शंका उपस्थित केल्या. त्याच नेत्यांनी लाडक्या बहिणी योजनेमध्ये महिन्याला ३००० रुपये देऊ असे आश्वासन आपल्या जाहीरनाम्यामध्ये दिले. त्यामुळे महिलांचा महाविकास आघाडीवरील विश्वास उडाला अशी चर्चा आहे.