संविधान अमृत महोत्सव दिनानिमित्त मॉडर्न मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन
1 min read
बेल्हे दि.२५ :- बेल्हे (ता. जुन्नर) येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये संविधानाचा अमृत महोत्सव दिन साजरा करण्यात आला. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
ॲड. शंकर धरम व ॲड. सिद्धेश पंडित यांनी विद्यार्थांना संविधानाचे महत्त्व, संविधानामध्ये आपले असलेले हक्क व कर्तव्य, संविधानाची गरज, संविधानाची निर्मिती कशी झाली? त्याच बरोबर संविधान निर्मिती ची गोष्ट सांगितली.
तसेच संविधानाचा आदर करणे व रक्षण करण्याचे ॲड. शंकर धरम यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच लॉ व्यवसाय करण्याचा सल्ला दिला.त्यासाठी लागणारी शिक्षणिक पात्रता समजाऊन सांगितली.
यावेळी शाळेच्या प्राचार्या विद्या गाडगे, उपप्राचार्य के.पी सिंग, विश्वस्त दावला कणसे, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.