दुचाकी झाडाला धडकून दुचाकीस्वार ठार
1 min read
आळेफाटा दि.२६:- दुचाकी रस्त्यालगतच्या झाडाला धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार मृत्युमुखी पडल्याची घटना रविवारी रात्री नऊच्या दरम्यान बेल्हे गावाजवळ घडली. या बाबत आळेफाटा पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार सुनिल बबन कर्डक (वय ४५ वर्ष,रा.ओझर नंबर २,ता.जुन्नर जि.पुणे)
हे त्यांची आरटीओ पासिंग नसलेली नवीन हिरो होंडा सुपर स्पेंलडर ही दुचाकी घेऊन रविवारी (दि.२४ ) रात्री नऊच्या सुमारास बेल्हे गावातून आळेफाटाकडे जात असताना त्यांनी भरधाव वेगाने रस्त्याच्या खाली उतरवून रस्त्यालगत झाडास धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची खबर त्यांचे जावई विशाल भाऊसाहेब बेलकर यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात दिली.
आळेफाटा पोलिस ठाण्यात दुचाकीस्वार मयत सुनिल बबन कर्डक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार विकास गोसावी करीत आहेत.