दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी साजरी

1 min read

निमगाव सावा दि.२५:- निमगाव सावा (ता.जुन्नर) श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये महाराष्ट्राचे शिल्पकार व पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या १२५ व्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

संस्थेचे सचिव परेश घोडे यांच्या शुभहस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद शिंदे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या महान कार्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की १ नोव्हेंबर १९५६ मध्ये द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी कार्यभार सांभाळला.

१ मे १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून निवड झाली. यशवंतराव चव्हाणांचं कार्य हे राज्य आणि देशाप्रती मोठं होतं.

राजकीय पटलावरील एक मोठं नाव त्यांचं त्यावेळी होतं आणि ते आजही आहे. १९६२ ते ६६ या काळात भारताचे संरक्षण मंत्री 1966 ते 70 भारताचे गृहमंत्री, 1970 ते 74 भारताचे अर्थमंत्री आणि 1974 नंतर भारताचे परराष्ट्र मंत्री अशा वेगवेगळ्या पदांवरती त्यांनी आपले कर्तुत्व सिद्ध केले.

यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म मार्च 1913 कराड या ठिकाणी झाला. 25 नोव्हेंबर 1984 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांनी भारताचे उपपंतप्रधान म्हणून काही काळ कामकाज पाहिले. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे शिल्पकार पहिले मुख्यमंत्री आणि आजच्या महाराष्ट्रातील अनेक दिग्दज राजकारण्यांचे गुरु म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांना माझे शतशः नमन.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार, सचिव परेश घोडे, संस्था प्रतिनिधी कविता पवार, प्राचार्य प्रल्हाद शिंदे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राचे केंद्र संयोजक प्रा.अनिल पडवळ, कला शाखाप्रमुख सुभाष घोडे, विज्ञान शाखाप्रमुख प्रवीण गोरडे, प्रा माधुरी भोर, प्रा पूनम कुंभार,

राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा ज्योती गायकवाड,प्रा अश्विनी जोरे, प्रा पुनम पाटे, प्रा धनंजय भांगरे सर सर्व महाविद्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र संयोजक प्रा अनिल पडवळ यांनी केले व प्रा सुभाष घोडे यांनी आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे