अतुल बेनके यांची पहिली प्रतिक्रिया 

1 min read

जुन्नर दि.२३:- अतुल बेनके यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून म्हटले आहे की, माझ्या जुन्नर विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनी, कार्यकर्त्यांनो आणि सहकाऱ्यांनो, या निवडणुकीत आपण सर्वांनी एकजुटीने, अपार मेहनत घेतली.

राजकारणात हार-जीत ही चालूच असते. यशाने हुरळून जायचं नाही आणि अपयशाने खचायचं नाही हि स्व. वल्लभशेठ बेनके साहेबांनी दिलेली शिकवण जोपासून तालुक्यातील माय बाप जनतेची सेवा यापुढेही अखंडपणे चालू राहील.

गावागावांमध्ये जाऊन माझ्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल मी तुम्हां सर्वांचा ऋणी आहे. तुमचे सर्वांचे योगदान आणि संघर्ष माझ्यासाठी मोठी ताकद आहे. तुमचं प्रेम आणि पाठिंबा यापुढेही माझ्यासोबत असेल, याची मला खात्री आहे.

माझ्यासाठी झटलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचे, माता-भगिनींचे, जेष्ठांचे, युवक युवतींचे मनःपूर्वक आभार!

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे