शिर्डीला देवदर्शनासाठी जाताना दोघांचा अपघाती मृत्यू

1 min read

बेल्हे दि.२१:- मालवाहतूक आयशर टेम्पो, दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकी वरील दोघेजण जागीच ठार झाले. ही घटना गुरुवार (दि.२१) सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारात बेल्हे-जेजुरी महामार्गावर मंगरूळ येथील कुकडी नदीच्या वळणावर घडली.

या अपघातामध्ये रत्नाकर श्रीमंत गायकवाड (वय ३६, रा.कोंढवा पुणे) आरती राजू माने (वय ३८, राहणार जुनी सांगवी पुणे) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. आळेफाटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पुण्यावरून शिर्डी येथे देवदर्शनासाठी निघालेले दुचाकीस्वार युवक युवती चालले होते.

मंगरूळ (ता.जुन्नर) येथील कुकडी नदीच्या वळणावर दुचाकी क्र.एमएच १२ एसएस ९२९६ जात असताना समोरून येणाऱ्या मालवाहतूक आयशर टेम्पो क्र.एम. एच.१५ डीके ५०८८ या टेम्पोने तरुण तरुणीला चिरडले. यामध्ये दुचाकीवरील तरुण,

तरुणीचा दुर्दैवाने जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी आळेफाटा पोलीस दाखल झाले. पोलिसांनी मालवाहतूक आयशर टेम्पो चालकाला ताब्यात घेतले असून टेम्पो चालक भारत शिरतार (रा.सिन्नर जि.नाशिक) वरती गुन्हा दाखल केला आहे.

शुभम शिवदास दुधाळ यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास आळेफाटा पोलीस करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे