प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात
1 min readपुणे दि.१२:- राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण तापले असतानाच आज पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होत आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यातील महायुतीच्या ३१ उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा होत असून पंतप्रधान काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठीही मोदी यांची पुण्यात सभा झाली होती.या सभेत पंतप्रधानांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टिका केली होती. त्यामुळे, ते आज पुण्यात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, टिळक रस्त्यावरील स. प महाविद्यालयाच्या मैदानावर ही सभा होणार असून त्यासाठीची तयारी पूर्ण झालेली असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महायुतीचे नेते या सभेस उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.