मुख्यमंत्री शिंदेंची सभा अचानक रद्द झाल्याने उमेदवाराचा वाढला रक्तदाब
1 min readश्रीरामपूर दि.१२:- श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात उभे राहिल्याने व दोन्ही उमेदवारांच्या फलकांवर महायुतीच्या नेत्यांचे फोटो असल्याने सध्या मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. त्यात सोमवारी दि. ११ रोजी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची होणारी. सभा अचानक रद्द करण्यात आल्याने उमेदवाराचा रक्तदाब वाढला.असून त्यांना तातडीने रविवारी रात्री उपचारासाठी येथील एका रुग्णालयात दाखल केले आहे.सभा रद्द झाल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे असतांना मतदारसंघात नाट्यमय घडामोडीनंतर हा मतदारसंघ राष्ट्रवादी अजितदादा गटाला देण्यात आला. विद्यमान आमदार लहू कानडे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र त्यावेळी शिवसेना शिंदे गटाने देखील भाऊसाहेब कांबळे यांना पक्षाचा एबीफॉम दिला. त्यामुळे महायुतीचे दोन उमेदवार झाले.आणि दोघांनी पक्षाचा उमेदवारी अर्ज दाखल केला. माघारीच्या दिवशी कांबळे अर्ज माघारी घेतील अशी अपेक्षा होती. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे महायुतीचे कानडे व अचानक मुख्यमंत्र्यांची कांबळे हे दोन्ही उमेदवार रिंगणात उतरले आहेत. आज मुख्यमंत्री शिंदे शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ जिल्ह्यात आले असून. नेवासा व श्रीरामपूर अशा दोन सभा होणार होत्या. मात्र अजित पवार गटाने या ठिकाणी सभा घेण्यास मुख्यमंत्र्यांना विरोध केल्याने अखेर मुख्यमंत्र्यांनी श्रीरामपूरमधील सभा रद्द केली. रविवारी रात्री साडेदहा वाजता सभा रद्द करण्यात आल्याचे पत्र जिल्हाप्रमुख नितीन औताडे यांनी काढले.सभा रद्द झाल्याने शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांचा रक्तदाब वाढला. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत कांबळे म्हणाले, पक्षाने मला एबी फॉर्म दिला आहे, त्यामुळे मी धनुष्यबाण चिन्हावरच निवडणूक लढवणार आहे. पक्षाने सांगितले असते तर मी माघार घेतली असती, परंतु सामान्य जनता माझ्या पाठीशी आहे, आणि मी निवडणूक लढणारच. महायुतीतील दोन प्रमुख उमेदवार एकमेकांसमोर आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून कांबळे मैदानात आहेत तर राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून कानडे यात मुख्यमंत्र्यांची सभा रद्द लढत होत आहे.