पक्षविरोधी भूमिका घेतल्याने देवराम लांडे पक्षातून निलंबित
1 min read
जुन्नर दि.११:- माजी जिल्हा परिषद सदस्य पुणे देवराम सखाराम लांडे व प्रदेश उपाध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अमोल देवराम लांडे या दोघांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातून निलंबन करण्यात आले आहे. याबाबत पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी सोमवार दि.११ रोजी पत्र प्रसिद्ध केले आहे.
या पत्रात म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीतील घटक पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात पक्षविरोधी भूमिका घेतलेली आहे. तसेच महायुती सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे.
हे कृत्य आपण जाणीवपूर्वक करून पक्ष शिस्तभंग केलेला असल्यामुळे आपनास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून निलंबित करण्यात येत आहे.