‘शरद पवार निवृत्त झाल्यानंतर हाच पठ्ठ्या कामे करणार’:- अजित पवार

1 min read

बारामती दि.११:- ज्येष्ठ नेते शरद पवार राजकारणातून निवृत्त झाल्यावर हाच पठ्ठ्या कामे करणार, बाकी कुणाचाच घास नाही. आपले नाणे खणखणीत आहे. अजून आपण १० वर्षे काम करू शकतो, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले.फलटणमधील प्रचारसभेत ते बोलत होते. बारामतीमधील एका सभेत बोलताना शरद पवार म्हणाले होते की, माझी राज्यसभेची अजून दीड वर्षे आहेत. तुम्ही या आधी १४ वेळा निवडून दिले आहेत. आता कुठेतरी थांबले पाहिजे, नवी पिढी समोर आली पाहिजे, असे वक्तव्य त्यांनी केले होते. या वक्तव्याच्या आधारे अजित पवार यांनी आपले मत मांडले.अजित पवार म्हणाले, ‘परवा बारामतीमध्ये भाषण करताना शरद पवारांनी सांगितले की माझी मुदत संपल्यावर मी बाजूला होणार. ते राजकारणापासून दूर राहिले तर कामे कोण करणार? हाच पठ्ठ्या कामे करणार. दुसऱ्याचा घास नाही. तिथे आपले नाणे खणखणीत आहे. मी अजून १० वर्षे काम करणार,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे