ज्वारीचे दर कडाडले; अवकाळी पावसानं ज्वारीच्या पिकांना माेठा फटका

1 min read

पुणे दि.१:- राज्यात अनेक ठिकाणी मागील काळात अवकाळी पावसानं ज्वारीच्या पिकांना माेठा फटका बसला आहे. त्याचा परिणाम बाजारातील दरावर हाेऊ लागला आहे. पुणे व नगर बाजार समितीत सध्या ज्वारीची आवक हाेत आहे. त्यामुळं ज्वारीचे २ हजार ५०० ते ४ हजार १०० रुपये दर झाले आहे. भविष्यकाळात आणखी दर वाढण्याची शक्यता व्यापारी वर्गाकडून वर्तवली जात आहे.


पुणे व नगरच्या बाजार समिती दररोज ज्वारीच्या नव्या मालाची आवक सुरू आहे. दरात मात्र सतत बदल होताना दिसत आहेत. ज्वारीचे दर सामान्यासाठी महाग झाले आहे. सध्या ज्वारीच्या खरेदीस मध्यम प्रतिसाद आहे. दरवाढ होत राहिल्यास उलाढालीवर परिणाम होऊ शकतो. सध्या बाजारात ज्वारीचे दर अधिक आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे