एकरात १६ टन बटाट्याचे उत्पादन; शेतकऱ्याने मिळवला दिड लाख रुपयांचा नफा

1 min read

बेल्हे दि.३ :- बोरी बुद्रुक (ता.जुन्नर) येथील सिद्देश जाधव या शेतक-याने बटाटयाचे एक एकरात १६ टन उत्पादन घेतले असुन यामधुन त्यांणा दीड लाख रुपयांचा नफा मिळाला आहे. गावातील अनेक शेतकरी हे नेहमीच चांगल्या प्रकारची पिके असतात असेच येथील युवा शेतकरी सिद्देश जाधव यांनी शेतात बटाटा लावण्याचे ठरवले त्यानुसार एक एकर क्षेत्राची या पिकासाठी निवड केली.

या शेतात आधीचे पिक निघाल्यानंतर सुरवातीलाच या शेतात ट्रॉली कोंबड खत पांगवले व हे शेत त्यांणी नांगरून टाकत ते शेत त्यांणी काही दिवस तापत ठेवले व त्यानंतर शेताला पाळी घातली. जाधव यांनी एफ (कुकराज) वाणाची सुमारे १५ कट्टे (७०० किलो) बियाने आणुन ट्रॅक्टर द्वारे लागवड करण्यात आली. तसेच संपूर्ण पिकाला ठिबक सिंचनाचा वापर करण्यात आला होता.

योग्य प्रकारची सेंद्रिय औषध व रासायनिक खते व फवारणी केल्याने हे पिक चांगले आले होते. तिन महिन्यात हे पिक निघाले असुन यामधुन १६ टन पेक्षा जास्त माल निघाला असुन सध्या बटाट्याला किलोला १० ते १२ रुपये बाजारभाव चालु असुन त्यांची १२ रुपये किलो प्रमाणे विकला आहे. तसेच त्यांणा या पिकासाठी ४५ ते ५० हजार रुपये खर्च आला होता.खर्च वजा जाता जवळपास दीड लाख रुपयांचा नफा मिळाला आहे.

जाधव हे आपल्या शेतामध्ये प्रत्येक वेळेस वेगवेगळे प्रयोग करत असतात. हिवाळ्यामध्ये यांनी पंधरा गुंठे मध्ये सेंद्रिय पद्धतीने स्ट्रॉबेरीचे पीक घेतले होते. यामध्येही त्यांना चांगल्या प्रकारे फायदा झाला होता.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे