आळेफाटा कांदा मार्केट मध्ये विक्रमी आवक; चार वर्षांतील आवकीचा उच्यांक

1 min read

आळेफाटा दि.३१:- आळेफाटा (ता.जुन्नर) येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शुक्रवार (दि.३१) कांद्याची विक्रमी आवक झाली.गेल्या चार वर्षांत प्रथमच विक्रमी आवक झालेली असुन बाजारभाव अतिशय कमी मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. शासणाने प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान जाहीर केल्याने आज मार्केट आवक वाढलेली आहे.


मार्केट मध्ये कांद्याला भाव चांगला मिळेल या आशेने या ठिकाणी आणला होता. परंतु अतिशय कमी भाव मिळाला असुन झालेला खर्च देखील फिटणार नाही.विक्रमी आवक झाल्याने मार्केटमध्ये कांदा टाकायला सुद्धा जागा राहिली नव्हती. त्यामुळे मार्केटच्या बाहेर असणाऱ्या मैदानात कांदा मोठ्या प्रमाणात साठवला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणात आवक काही वर्षानंतर होत असल्याची माहिती आळेफाटा बाजार समितीचे व्यवस्थापक प्रशांत महाबरे यांनी दिली.


एकुण कांदा पिशवी :- 53 हजार 156 कांदा भाव प्रती दहा किलो चे गोळे कांदे (गावराण) 5/10लॉट – १ नंबर 90 ते 100 १) सुपर गोळे कांदे 1 नंबर -80 ते 100, 2)सुपर मेडीयम कांदे 2 नंबर -70 ते 80, 3)गोल्टी व गोल्टा कांदे 3 नंबर 40 ते 60, 4)चींगळी कांदे (लहान) 4 नंबर- 20 ते 40, 5)बदला कांदे 5 नंबर -20 ते 40, 6) हलका कांदा सिंगल पत्ती मेडीयम व मोठा- 50 ते 70,

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे