शरद सोनवणे यांना मिळाले रिक्षा चिन्ह;उद्या प्रचाराचा शुभारंभ
1 min read
आळेफाटा दि.४:- १९५ जुन्नर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये शरद भिमाजी सोनवणे यांना रिक्षा हे चिन्ह मिळाले असून यांच्या प्रचाराचा नारळ वाढवण्याचा कार्यक्रम पिंपळवंडी ग्रामस्थांनी उद्या मंगळवार दि.५ रोजी संध्याकाळी ५ वा. मळगंगा माता मंदिर, पिंपळवंडी येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व मित्र परिवार, कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे. रिक्षा चिन्ह मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष दिसून आला. चिन्ह मिळाल्यावर कार्यकर्ते आनंदी दिसू लागले.