मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून विधानसभा निवडणुकीतून माघार, एकही उमेदवार उभा करणार नाही; जरांगे पाटलांचा युटर्न
1 min read
जालना दि.४:- मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्यासाठी जरांगे यांच्याकडून चर्चा केली जात होती.त्यांनी 3 ऑक्टोबर रोजी कोणकोणत्या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणार, याची माहिती दिली होती. तसेच कोणत्या जागेवरील उमेदवार पाडण्याचे काम करायचे याबाबतही सांगितले होते. त्यानंतर आज जरांगे यांनी आज मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे.