घरात दडून बसलेल्या घोणस ला सर्पमित्र आकाश माळी यांनी दिले जीवदान
1 min read
पिंपळवंडी दि.४:- जुन्नर तालक्यातील पिंपळवंडी वाकी येथील शेतकरी शिवाजी पिराजी फुलसुंदर यांच्या घरात दडून बसलेल्या अति विषारी चार फूट असलेल्या घोणस या सापाला सर्पमित्र आकाश माळी यांनी गजानन फुलसुंदर यांच्या मदतीने त्या विषारी सापाला पकडून निसर्गात सोडून जीवनदान दिले.सध्या हिवाळा चालू होतं असल्यामुळे घोणस या सापाचा प्रजनन काळ सुरू होतो त्यामुळे हे साप एकाच ठिकाणी दोन ते तीन आढळत असतात. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन सर्पमित्र आकाश माळी यांनी केली आहे.
घराजवळ नेहमी स्वच्छता ठेवावी, तसेच गवत वाढलेले काढावे, दगड विटांची ढिगार घराजवळ लावू नये, घराजवळ वाळलेली लागड ढीग लावू नये, घराजवळ खरकट कचरा टाकू नये त्याठिकाणी उंदरांची संख्या वाढते उंदरांना खाण्यासाठी तिथे साप येतो.
काही गोष्टींची काळजी घेतल्यास सर्पदंश पासून वाचता येते. आपल्या घराजवळ साप दिसल्यास त्यांना न मारता आपल्या जवळील सर्पमित्र किंवा वनविभागामध्ये कळवावे असे आवाहन देखील आकाश माळी यांनी केले आहे.