बेल्हे गावात रस्तावर चेंबर खचल्याने अपघाताची शक्यता
1 min readबेल्हे दि.३१:- बेल्हे (ता.जुन्नर) गावातील यशवंतराव चव्हान पतपेढी समोरील आता नविन झालेल्या सिमेंट कॉंक्रीट रोडवरील चेंबर खचले आहे. चेंबर रस्त्याच्या मधोमध असल्याने अपघात होन्याची शक्यता आहे. या ठिकाणी मोठी नागरिकांची वर्दळ असते तसेच दिवाळीनिमित्त बाजार खरेदी करण्यासाठी जवळ मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे स्थानिकांची या रस्त्यावर वर्दळ असते. हा चेंबर रस्त्याच्या मधोमध असल्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी लहान मुले ही खेळत असतात त्यांनाही धोका आहे. तरी ग्रामपंचायत प्रशासनाने त्या चेंबर ची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. अपघात होण्याआधी प्रशासन जागे होतंय का याकडे लक्ष लागलं आहे. ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन तातडीने या चेंबर ची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशी करत आहेत.