अतुल बेनके यांनी घेतला शक्तीस्थळांचा आशीर्वाद; अभिनेते सयाजी शिंदे राहणार उपस्थित; आज जुन्नर मध्ये सभा

1 min read

Oplus_131072

जुन्नर दि.२८:- जुन्नर तालुक्याच्या इतिहासात राजकीय व सामाजिक क्षेत्रात अजरामर असे कार्य केलेल्या व्यक्तिमत्वांच्या शक्तीस्थळांचे आशीर्वाद आज आमदार अतुल बेनके यांनी सपत्नीक घेतले.

आज सोमवार दि.२८ ऑक्टोबर रोजी ते विधानसभेचा उमेदवारी अर्ज जुन्नर येथे दाखल करणार आहेत. अभिनेते सयाजी शिंदे, मंत्री दिलीप वळसे पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून जुन्नर मध्ये आज मोठी सभा होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजन्मभूमी मध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे तसेच सुसंस्कृत राजकारणी म्हणून ओळख असलेले, सामन्यातून असामान्य झालेल्या परंतू

सतत जुन्नर तालुक्याच्या सामान्यांची काळजी वाहणारे लोकनेते स्व.वल्लभ बेनके, स्व.झांबर तांबे, स्व.लतानानी तांबे, स्व.शिवाजीराव काळे, स्व.कृष्णराव मुंढे, स्व.निवृत्ती शेरकर यांच्या स्मारकाला बेनके यांनी सपत्नीक अभिवादन केले.

त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा आदर करून जुन्नर तालुक्याच्या अविरत सेवेचा वसा आणि वारसा अखंड चालू ठेवण्याची प्रेरणा या महान व्यक्तींच्या अभिवादनातून ते घेत आहे अशी भावना आ.अतुल बेनके यांनी व्यक्त केली.

निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या पूर्वसंध्येला आ.अतुल बेनके यांनी शक्तीस्थळांना भेट दिल्याने, त्यांच्या नम्र व हळव्या स्वभावाची चर्चा जुन्नर तालुक्यात होत आहे.

आमदार अतुल बेनके यांचा अर्ज भरण्यासाठी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून लोक सकाळपासून जुन्नर मध्ये गर्दी करू लागले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे