मनोज जरांगे पाटील यांच्या कडून योगेश तोडकर यांना जुन्नर विधानसभेची उमेदवारी; सोमवारी भरणार अर्ज

1 min read

जुन्नर दि.२७:- मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार मराठा समाज सर्व शेतकरी संघटना यांच्याकडून जुन्नर तालुका विधानसभा उमेदवारी अर्ज योगेश रामदास तोडकर हे सोमवार वसुबारसच्या मुहूर्तावर सोमवार दि.२८ रोजी दुपारी ३ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दिनांक २४/१०/२०२४ रोजी अंतरवाली सराटी येथे मराठा क्रांतीसुर्य मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्येक तालुक्यामधून उत्सुक उमेदवारांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. त्या बैठकीसाठी जुन्नर तालुक्यामधून योगेश रामदास तोडकर त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत तसेच जुन्नर तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील मोठ्या संख्येने मराठा प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते. त्या बैठकीमध्ये जरांगे पाटील यांनी जुन्नर तालुक्यातील मराठा समाज व इतर समाज बांधवांनी शेतकरी बांधवांनी योगेश रामदास तोडकर यांचं नाव सर्वांना मते सुचवल्यामुळे व त्यांची मागील १३/१४ वर्षेंपासून शेतकरी संघटनेचे व मराठा समाजाचे काम करत असल्यामुळे तोडकर यांचे नाव जुन्नर तालुका विधानसभा उमेदवार म्हणून जाहीर केले व त्यांना फॉर्म भरण्यासाठी सांगितले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे