शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जुन्नर मधून सत्यशील शेरकर यांना उमेदवारी

1 min read

मुंबई दि.२६:- शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दुसरी यादी आज (ता.२६) जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत उमेदवारांची नावे जाहीर केली.जुन्नर तालुक्याचे लक्ष लागलेल्या उमेदवाराचे नाव (सत्यशील शेरकर) आज घोषित केले.१. एरंडोल -सतीश अण्णा पाटील २. गंगापूर -सतीश चव्हाण ३. शहापूर -पांडुरंग बरोरा ४. परांडा- राहुल मोटे ५. बीड -संदीप क्षीरसागर ६. आर्वी -मयुरा काळे ७. बागलान -दीपिका चव्हाण ८. येवला -माणिकराव शिंदे ९. सिन्नर- उदय सांगळे १०. दिंडोरी -सुनीता चारोस्कर ११. नाशिक पूर्व- गणेश गीते १२. उल्हासनगर- ओमी कलानी १३. जुन्नर- सत्यशील शेरकर१४. पिंपरी सुलक्षणा- शीलवंत १५. खडकवासला -सचिन दोडके १६. पर्वती -अश्विनीताई कदम १७. अकोले- अमित भांगरे १८. अहिल्या नगर शहर -अभिषेक कळमकर १९. माळशिरस- उत्तमराव जानकर २०. फलटण -दीपक चव्हाण २१. चंदगड नंदिनीताई – भाबुळकर कुपेकर २२. इचलकरंजी- मदन कारंडेशरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यापूर्वी ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर आज (ता.२६) बावीस उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे