जिल्ह्यात आजपासून विधानसभा उमेदवारी अर्ज दाखल होणार

1 min read

पुणे दि. २१ विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारपासून (दि.२२) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुक कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. २९ ऑक्टोंबर पर्यंत आहे. शनिवार-रविवारी सार्वजनिक सुट्टी यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना सहा दिवसांचा अवधी आहे. विधानसभेच्या निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या आदेशाने नामनिर्देशन व्यवस्थापन, ईव्हीएम व्यवस्थापन व यंत्रांचे वितरण, पोस्टल बॅलेट, इडीसी पथक, निवडणूक साहित्य वाटप पथक, मतदार यादी व्यवस्थापन, मतदार मदत कक्ष व तक्रार निवारण कक्ष, जनसंपर्क व प्रसिद्धी कक्ष, एक खिडकी कक्ष, स्वीप व्यवस्थापन अशा विविध पथकांचे समन्वय अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ९ फिरती पथके (एफएसटी) आणि स्थिर सर्वेक्षण पथके (एसएसटी), ३ व्हिडिओ सर्वेक्षण पथके (व्हीएसटी), २ व्हिडिओ पाहणी पथकांचा (व्हीव्हीटी) समावेश आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे