‘लाडकी बहीण’चे राज्यात १ कोटी ६० लाख लाभार्थी; आतापर्यंत ४ हजार ७८७ कोटी रुपयांचे वाटप

1 min read

मुंबई, दि.६:- राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेच्या १.६० कोटी लाभार्थांना सुमारे ४,७८७ कोटी रुपयांचे वाटप झाल्याचेही सांगितले.राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर कॅबिनेटमंत्री उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार ब्राँकायटिसची लागण झाल्यामुळे ऑनलाईन हजर होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे इतर कोणतीही योजना बंद होणार नसल्याची ग्वाही दिली. यावेळी त्यांनी शेतकरी कुटुंबांना देण्यात येणारी मदत बंद केल्याचे वृत्त धुडकावून लावले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत लाभार्थी महिलांना सुमारे ४ हजार ७८७ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे