आई वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या शुभहस्ते पुतळ्याचे अनावरण
1 min read
बेल्हे दि.२६:- कलाकथीत यशोदा सुदाम कोंडाजी डोळस यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुतळ्याचे अनावरण तसेच यशोदाम वन या स्मृती स्थळाचा उद्घाटन समारंभ भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दल राष्ट्रीय अध्यक्ष तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या शुभहस्ते समारंभ बुधवार दि. 28 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे व कार्यक्रमाचे अध्यक्ष जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके हे असणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून राजकीय, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पुतळा अनावरण कार्यक्रम मातारमाई नगर रानमळा, बेल्हे (ता.जुन्नर,जिल्हा.पुणे) येथे होणार असून त्यानंतर बेल्हे येथील आराधना मंगल कार्यालय येथे जाहीर कार्यक्रम संपन्न होणार आहे. तरी हीच निमंत्रण पत्रिका समजून कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा जुन्नर तालुक्याचे अध्यक्ष राकेश सुदाम डोळस यांनी केले आहे.