समर्थ अभियांत्रिकीच्या ९ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट द्वारे सिरमा एस जी एस टेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनीत निवड
1 min read
बेल्हे दि.२५:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट, बेल्हे या अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग विभागातील ९ विद्यार्थ्यांची सिरमा एस जी एस टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीत निवड झाल्याची माहिती प्राचार्य डॉ.सतीश गुजर यांनी दिली.
महाविद्यालयाच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने कॅम्पस ड्राईव्ह २०२४ अंतर्गत या कॅम्पस प्लेसमेंट चे आयोजन करण्यात आले होते.सिरमा एस जी एस टेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनी ही ग्राहकांना जागतिक स्तरावर विविध प्रकारच्या पी सी बी डिझाईन,फायबर ऑप्टिक असेंब्ली,मेमरी मॉडेल.आर एफ आय डी मॉडेल,पावर सप्लाय आणि अडॅप्टर, डीसी मोटर्स आदी प्रकारचे प्रॉडक्ट तयार करतात. महाविद्यालयातील प्लेसमेंट विभागातर्फे दरवर्षी नामांकित कंपन्यांना बोलवून थेट मुलाखतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. तसेच सद्यस्थितीतील उपलब्ध नोकरीच्या संधी बाबत मार्गदर्शन केले जाते.
नुकत्याच पार पडलेल्या या कॅम्पस प्लेसमेंट मध्ये अंतिम वर्षाचे विद्यार्थी प्लेसमेंट साठी प्रविष्ट झाले होते.तीन स्तरावरती झालेल्या निवड प्रक्रियेत सुरुवातीला बुद्धिमत्ता चाचणी,तांत्रिक मुलाखत,व शेवटी एच आर राऊंड झाला.कंपनीच्या वतीने सीनियर मॅनेजर आणि एच आर प्रमुख दिनेश मिश्रा व अजय पटोले आणि एच आर ट्रेनिंग विशेषज्ञ तुषार थोपटे यांनी निवड प्रक्रिया पूर्ण केली.
त्यात अंतिम वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग शाखेतील आदेश मुसळे,रुचिता जगताप, दिया जठार,अपूर्वा पोखरकर,निकिता काळे,सुषमा बगाटे,वैष्णवी म्हस्के,गायत्री तांबोळी व सानिका ढोबळे या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.या कॅम्पस ड्राईव्ह साठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकमुनिकेशन इंजिनियरिंग विभागप्रमुख प्रा.निर्मल कोठारी.
ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा.सचिन पोखरकर, प्रा.प्रियांका लोखंडे,प्रा.पूनम भोर यांनी विशेष परिश्रम घेतले.निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके.
कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर,सर्व विभागाचे प्राचार्य, विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.