निमदरीत शेवंती पिक व्यवस्थापन व फुलशेतीच्या संधींवर शेतकरी परिसंवाद
1 min readजुन्नर दि.२३:- निमदरी (ता. जुन्नर) येथे पिक उत्पादन खर्च योजना, कृषी अर्थशास्त्र विभाग, म.फुले कृषी विद्यापीठ राहुरी व भारतीय कृषी अनुसंधान व पुष्पविज्ञान अनुसंधान निदेशालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “शेवंती पिक व्यवस्थापन व फुलशेतीच्या भविष्यातील संधी” या विषयावर शेतकरी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. रोहित निरगुडे यांनी शेतीतील कृषी अर्थशास्त्राचे महत्व याविषयी सखोल माहिती दिली. डॉ. दत्तात्रय सानप यांनी किमान आधारभूत किंमत कशी ठरवली जाते, शेतकऱ्याकडून माहिती संकलित करण्याच्या पद्धती व त्याचे शेतकऱ्यांना होणारे फायदे याबद्दल मार्गदर्शन केले. यानंतर, डॉ. गणेश कदम यांनी शेवंती पिकावरील रोग, किड व त्यावरील उपाययोजना याबाबत शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती दिली.फुलशेतीच्या विविध संधींवर सखोल मार्गदर्शन करताना डॉ. तारख नाथ, सहाय्यक प्रधान शास्त्रज्ञ यांनी विविध फुलपिके व त्यांच्या जाती, तसेच त्यांची बाजारपेठ याविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली.
या कार्यक्रमात निमदरी गावच्या लोकनियुक्त सरपंच सुवर्णा धोंडकर व उपसरपंच महेंद्र धोंडकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सूत्रसंचालन दत्तात्रय भगत यांनी केले, तर निमदरी गावचे ग्रामस्थ नवनाथ दादा शेळके यांनी सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमानंतर शेवंती पिकाच्या प्लॉटवर ड्रोनचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले, तसेच संपर्क शेतकरी प्लॉट भेटी देऊन शेतकऱ्यांच्या अडचणींवर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन पिक उत्पादन खर्च योजनेचे कृषी सहाय्यक स्वप्नील जाधव, सचिन देशमुख, गणेश डुंबरे, राजाराम कोरडे व राजेंद्र जोशी यांनी केले होते.