सह्याद्री व्हॅली च्या विद्यार्थांनी पाठवल्या जवानांना राख्या

1 min read

राजुरी दि.२१:- शाळांमध्ये विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाचे महत्त्व कळावे म्हणून रक्षाबंधनाचे कार्यक्रम घेतले जातात, परंतु सह्याद्री व्हॅली पब्लिक स्कूल राजुरी (ता.जुन्नर) येथील विद्यार्थ्यांनी शाळेतच राख्या बनवून त्या सीमेवरील लढणाऱ्या जवानांना पोस्टाने पाठविल्या आहेत. देशासाठी सर्वस्वाचे बलिदान देणारा सैनिक दिवस रात्र आपल्या परिवाराची ही पर्वा न करता सीमेवर तैनात असतो, त्याच्यासाठी सर्व देश बांधवच परिवार असतो या भावनेतून सैनिकांनी देखील या दिवशी आपल्या मनगटावर राख्या बांधाव्यात व ते एकटे नाहीत आम्ही देखील त्यांच्या सोबत आहोत. या भावनेतून विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमात शाळेतील पूर्व प्राथमिक विभाग ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी शाळेतच राखी बनविण्यासाठी लागणारे सर्व साहित्य आणून आपल्या कल्पक बुद्धिमत्तेतून राख्या साकारल्या. तयार करण्यात आलेल्या सर्व राख्या.जम्मू कश्मीर, गुजरात,पंजाब, पुणे येथील सैनिकांच्या बेस कॅम्पवर पोस्टाच्या साह्याने पाठविण्यात आल्या आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीच्या भावनेसोबतच बंधुभाव देखील वाढीस लागणार आहे असे शाळेचे मुख्याध्यापक सचिन डेरे यांनी स्पष्ट केले.शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्याध्यापिका रिजवाना शेख व शिक्षकवृंद उपस्थित होता.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे