२५ वर्षांची नक्षत्राचं देणं काव्यमंचची यशस्वी व कौतुकास्पद वाटचाल-कृष्णकुमार गोयल
1 min readपुणे दि.१९:- नक्षत्राचं देणं काव्यमंच, मुख्यालय, पुणे ३९ वतीने पिंपरी चिंचवड कवितेच्या राजधानीत”काव्यातील नक्षत्र… काव्यवाचन आविष्कार”या थिएटर शोचे आयोजन करण्यात आले होते. लावणी थिएटरला आली आणि तिला प्रतिष्ठा मिळाली. त्याचप्रमाणे कविता थिएटर आणून तिला प्रतिष्ठा मिळण्यासाठीच या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील निवडक कवी कवयित्रीनीं या कार्यक्रमात सहभाग घेतला. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड, पुणे येथे हा सोहळा रंगला. या कार्यक्रमाचे उद्घाटक सुप्रसिद्ध उद्योजक व कोहिनूर ग्रुपचे चेअरमन श्री कृष्णकुमार गोयल यांच्या शुभहस्ते वृक्ष पूजन व वृक्षाला पाणी घालून करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे बोल्ड कवी म. भा. चव्हाण, सुप्रसिद्ध निवेदक श्रीकांत चौगुले, समाजसेविका डॉ .अलका नाईक, मिलिंद घोगरे, वसंतराव कुलकर्णी, नक्षत्राचं देणं कायमंचचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राजेंद्र सोनवणे इ. अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी कृष्णकुमार गोयल म्हणाले,”संपूर्ण महाराष्ट्रातील वाढत गेलेली ही काव्य चळवळ कवींना प्रेरणा देणारे आहे. सामाजिक भान ठेवून हे संस्था कार्य करत आहे. कविता कधी सुचेल हे सांगता येत नाही. कवितेने मन प्रफुल्लित होते. गेली पंचवीस वर्ष अनेक संस्थेने पुस्तक प्रकाशित करून कवींना प्रकाशात आणले आहे.
संस्थेवर निष्ठा ठेवून पुढील काळात सहभाग घ्यावा व आपल्याला व्यासपीठ मिळवून घ्यावे. संस्थेच्या अध्यक्षांच्या धडपडीमुळे हा काय मंच कवींच्या आशेचा किरण बनला आहे.अशा प्रकारच्या भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या. “बोल्ड कवी म.भा. चव्हाण म्हणाले की,”नक्षत्राचं देणं काव्यमंच ही संस्था सर्वांच्या कौतुकास पात्र आहे. अनेक कवी कवयित्रींना घडवण्याचे काम करत आहे. अनेकांना व्यासपीठाच्या माध्यमातून समाजापुढे आणले आहे.
आजचा कार्यक्रमाचा शो म्हणजे कवी व कवितेला एका उंचीवर घेऊन जाणारा उपक्रम आहे. भविष्यात अजून कवी कवयित्रींना व्यासपीठ मिळण्यासाठी संस्थेची जोडणे आवश्यक आहे.” ज्येष्ठ विचारवंत श्रीकांत चौगुले म्हणाले,”कवितेची परंपरा खूप मोठी आहे. श्रावण आणि निसर्ग हा कवींच्या आत्म्याची संवाद करणार आहे. प्रेम आणि पाऊस या विषयाच्या कवितांनी येथील कवितेचे दालन समृद्ध केले आहे. कवितेची निर्मिती प्रक्रिया आणि त्यातून आलेले अनुभूती याची मांडणी करत कवितेचे महत्व सांगितले ”
यावेळी कवी रामदास अवचर यांच्या”रानफूल”या तिसऱ्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच कवी सुरेशचंद्र चन्नाल यांच्या पहिल्या”तिचा स्पर्श ” या काव्यसंग्रहाचे सुद्धा प्रकाशन याप्रसंगी करण्यात आले. यावेळी चिरंजीव साईराजे सोनवणे यांनी गिटार वादन करून रसिकांची मने जिंकली. काव्यातील नक्षत्र … काव्यवाचन आविष्कार… या थिएटर शो मध्ये पाऊस व प्रेम या विषयावरची कवितांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
या ओलचिंब काव्य मैफल सहभाग घेणाऱ्या कवी कवयित्रींमध्ये बोल्ड कवी म.भा. चव्हाण -पुणे, कवयित्री डॉ.अलका नाईक मुंबई,कविवर्य यशवंत घोडे-जुन्नर ,कविवर्या सौ वृषाली टाकळे-रत्नागिरी,कविवर्या शहानूर तडवी -जळगाव,कविवर्य मनोज कुमार सरदार-बुलढाणा ,कविवर्य पियुष काळे-आळेफाटा ,कविवर्या सौ सुलभा चव्हाण- मालाड , कविवर्य डॉ. लक्ष्मण हेंबाडे सोलापूर, कविवर्य रामदास अवचर-नगर,कविवर्य सतिश कांबळे-सांगवी,कविवर्य-सुनील बिराजदार-सोलापूर,
कविवर्य भाऊसाहेब आढाव-चिंचवड, कविवर्य अनिल जाधव-दुबई,कविवर्य प्रा.नरेंद्र पोतदार-गोंदिया,कविवर्य अशोक वाघमारे- देहू रोड,कविवर्य अक्षय पवार -श्रीगोंदा , कविवर्य नवनाथ पोकळे-बीड, कविवर्य मंगेश रेडीज-मुंबई, कविवर्य एम. ए .रहीम -चंद्रपूर, कविवर्या सौ ज्योती भोर-हांडे-, कविवर्या रोहीणी मंगरूळकर-चंद्रपूर,कवीवर्य श्री सुरेशचंद्र चनाल-निगडी,कविवर्य श्री पांडुरंग घोलप- रोहोकडी जुन्नर, कविवर्य डॉ.शीलवंत मेश्राम-चंद्रपूर, कविवर्या सौ. अर्चना धानोरकर – वर्धा,
,कविवर्य बबन चव्हाण-च-होली इ.सहभाग घेतला. या कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये भाऊसाहेब आढाव, यशवंत घोडे, मनोजकुमार सरदार, मिलिंद घोगरे, सुधाकर गायकवाड, संपत नायकोडी, गणेश लखणे, बालाजी थोरात, अनिल जाधव, शीलवंत मेश्राम, बबन चव्हाण, भास्कर भालेराव,जुई यादव, प्रशांत निकम, भाऊसाहेब गायकवाड, स्वाती भंडारे, विजय साठे काका इ.नी पुढाकार घेऊन कार्यक्रम संपन्न केला.
या कार्यक्रमाचे आयोजक व संयोजन तसेच बहारदार निवेदन प्रा. राजेंद्र सोनवणे राष्ट्रीय अध्यक्ष-नक्षत्राचं देणं काव्यमंच,कवी वादळकार, पुणे यांनी केले.