मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला उच्चांकी भाव
1 min read
आळेफाटा दि.१२:- आळेफाटा येथील बाजार समीतीत कांदा खातोय भाव आळेफाटा येथील उपबाजारात रविवार दि.११ रोजी कांद्याच्या ११ हजार ९४३ पिशवींची आवक झाली असुन चांगल्या प्रतिचा एक्सट्रा गोळा कांद्यास दहा किलोला ४११ रूपये बाजारभाव मिळाला आहे. अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती संजय काळे, संचालक प्रितम काळे, सचिव रुपेश कवडे व व्यवस्थापक प्रशांत महाबरे यांणी दिली. तर मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला रविवार (दि.११) उच्चांकी बाजारभाव मिळाला.
१९ हजार पिशवी कांद्याची आवक होऊन चांगल्या प्रतीचा कांदा दहा किलोला ४२१ या उच्चांकी भावाने विकला गेला आहे, अशी माहिती उपसभापती सचिन पानसरे यांनी दिली.जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा या ठिकाणी झालेल्या.
मोढयांत एक नंबर सुपर गोळा कांद्यास दहा किलोस ३८१ ते ४०१ रुपये बाजारभाव मिळाला तर दोन नंबर कांद्यास ३६० ते ३८० बाजारभाव मिळाला.तीन नंबर गोल्टी कांद्यास ३४१ ते ३६० रूपये बाजारभाव मिळला तर चार नंबर बदला गोल्टी कांद्यास दहा किलोस २५० ते ३५० बाजारभाव मिळाला.