राजुरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या ड्रोन मशिन द्वारे फवारणी

1 min read

राजुरी दि.८:- शेतक-यांनी आधुनिक शेतीची कास धरून अत्याधुनिक ड्रोनच्या माध्यमातुन पिकांवर औषधें फवारणी करावी असे आवाहन पुणे विभागाचे कृषी सह संचालक रफिक नाईकवाडी यांनी राजुरी या ठिकाणी केले.

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजने मधून राजुरी (ता.जुन्नर) येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीला मंजुर झालेल्या ड्रोन मशिन द्वारे कश्या पध्दतीने फवारणी केली जाते या कामकाजाची प्रत्यक्ष शेतावर जाऊन पहाणी केल्यानंतर उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन करताना.

ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा कृषी अधिक्षक संजय काचोळे, तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले, पंचायत समितीचे माजी सभापती व सोसायटीचे संचालक दिपक औटी, विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक कुंडलिक हाडवळे, सोसायटीचे चेअरमन कारभारी औटी, व्हा.चेअरमन, अविनाश औटी,वल्लभ शेळके. खरेदी विक्री संघाचे संचालक लक्ष्मण घंगाळे, कृषी अधिकारी मुकेश महाजन, एस.कोल्हे , लक्ष्मण फावडे, बाबाजी औटी, संजय औटी, कारभारी गंधट, दस्तगिर पठाण, सोसायटीचे सचिव संतोष वाईकर आदी मान्यवर शेतकरी उपस्थित होते.यावेळी उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन करताना. नाईकवडी म्हणाले की राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या योजनेतुन मिळालेली ड्रोन मशीन हि राजुरी येथील सोसायटीला पहिला मिळण्याचा मान मिळाला आहे‌. ड्रोन ने फवारणी केल्याने वेळ ,पैसा दोन्हीही वाचत आहे.माजी सभापती औटी म्हणाले की ड्रोन. मशीन द्वारे कांदा, तुर, सोयाबीन मुग, उडीद, ऊस तसेच इतर सर्व पिकांना फवारणी करता येते. त्यामुळे सर्व शेतक-यांनी मशीन द्वारे फवारणी करावी.
प्रास्ताविकात वल्लभ शेळके म्हणाले की सोसायटीची वतीने शेतक-यांसाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबविले जात असुन राजुरी हे बिबट्या प्रवण क्षेत्रात मोडत असल्याने बिबट्यांची संख्या जास्त असल्याने तसेच अनेक अडीअडचणी येत होत्या. त्यामुळे सोसायटीने औषध फवारणीसाठी ड्रोन मशिन घेण्याचे ठरवले होते. व या ड्रोनच्या मशीन द्वारे फवारणी केल्याने यांचा फायदा शेतक-यांना होणार आहे. उपस्थित मान्यवरांचे आभार अविनाश औटी यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे