आळेफाटा बाजारात डाळींबाला ७ हजार रुपये उच्चांकी भाव

1 min read

आळेफाटा दि.२७:- आळेफाटा (ता.जुन्नर) बाजार समितीत गुरूवार दि.२५ रोजी डाळींबाच्या २० किलोच्या एका क्रेटला ७ हजार रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला आहे अशी माहिती अध्यक्ष संजय काळे, संचालक नबाजी घाडगे, सचिव रुपेश कवडे, व्यवस्थापक प्रशांत महाबरे यांनी दिली आहे.

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत असणाऱ्या उपबाजारात कांद्या प्रमाणे आता डाळिंबाचे दररोज लिलाव मोठ्या प्रमाणावर होऊ लागले असुन यामध्ये गुरूवारी एक नंबर डाळिंबास वीस किलोच्या एका क्रेटला तब्बल ७ हजार रुपयांचा भाव मिळाला आहे.

त्या खालोखाल त्याच्या दोन नंबर डाळिंबाच्या एका क्रेटला ५ हजार रुपयांचा भाव मिळाला आहे. तर तिन नंबर च्या एका विस किलोच्या क्रेट ला ४ हजार रुपये बाजार भाव मिळाला आहे तर चार नंबर च्या एका वीस किलोच्या क्रेट ला ३ हजार रुपयांचा बाजारभाव मिळाला तसेच मार्केट मध्ये १००६ क्रेट विक्रीसाठी आले होते.

या बाजार समितीत पारनेर, संगमनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शिरूर, अहमदनगर या ठिकाणाहुन शेतकरी डाळिंब विक्रीसाठी येत असल्याने त्यामुळे पुणे आणि नगर जिल्ह्यासाठी ही महत्त्वाची बाजार पेठ असुन गुरूवारी झालेल्या मोंढयात चांगला बाजार मिळाला आहे.

अशी माहिती डाळिंब आडतदार प्रविण लेंडे, विशाल कुटे, पप्पु सरोदे, संदिप लोढा, गणेश गडगे, निशिकांत ढोमसे, शैलेश जाधव यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे