शेतकऱ्यांना दिलासा; एक रुपयात पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ
1 min readमुंबई दि.१६:- जास्तीत-जास्त शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा याेजनेचा लाभ घेता यावा, यासाठी सरकारच्या वतीने आता पीक विमा भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
आजमितीला नगर जिल्ह्यातील ४ लाख २९ हजार ८३९ शेतकर्यांनी यंदा या योजनेत सहभाग नोंदवला आहे. त्यांनी पीक विम्यासाठी ९ लाख ३७ हजार ३८० अर्ज दाखल केलेले आहेत.
यात १४ हजार ३८० कर्जदार शेतकर्यांचा, तर ९ लाख २३ हजार बिगर कर्जदार शेतकर्यांचा समावेश आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली. आता या विमा योजनेला १५ दिवसांची मुदतवाढ मिळाल्याने अधिकाअधिक शेतकर्यांना या योजनेत सहभाग घेता येणार असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.