जगातील पहिली सीएनजी बाईक नितीन गडकरी यांच्या हस्ते पुण्यात लाँच

1 min read

पुणे दि.६:- पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरवाढीमुळे बजाजकडून जगातील पहिली सीएनजी बाईक लाँच करण्यात आली आहे. केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते शुक्रवार दि.५ पिंपरी चिंचवडमध्ये या बाईकचा लाँचिंग सोहळा पार पडला. यावेली, ही सीएनजी बाईक जगातील पहिली सीएनजी दुचाकी असल्याचा दावाबजाजकडून करण्यात आला आहे. पेट्रोल आणि सीएनजी अशी हायब्रीड बाईक असून 2 किलो सीएनजीमध्ये तुम्ही 230 किमी प्रवास करू शकता. तर, 2 लीटर पेट्रोल आणि 2 किलो सीएनजीमध्ये तुम्हाला 330 किमीचा टप्पा गाठता येईल. पेट्रोलच्या वाढत्या दराने त्रस्त झालेल्या दुचाकीस्वारांची आता लवरकरच मुक्तता होणार आहे. कारण, बजाजने वाढत्या पेट्रोलच्या दराला पर्याय म्हणून सीएनजी बाईकची निर्मिती केली. ज्या बाईकचं अनावरण आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते झालं. जगातील ही पहिली सीएनजी बाईक असल्याचा दावा बजाज कंपनीने केला आहे. या बाईकमुळं दुचाकीस्वारांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा ऑटोमोबाईल क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.सीएनजी बाईकची किंमत एक लाखापेक्षा कमी असावी, अशी बजाजकडून अपेक्षा आहे. त्यामुळं ही बाईक चांगली प्रचलित होईल. एकदा टाकी फुल केली की ही बाईक 230 किलोमीटरचं एव्हरेज देईल, असा दावा केला जात असून ही महत्वाची बाब आहे. पण, या बाईकमध्ये सीएनजीची टाकी कुठं आहे. हे शोधून काढायचं म्हणजे एक संशोधनाचा भागच आहे. बजाज कंपनीने ज्या पद्धतीने या बाईकची निर्मिती केलीये, यासाठी त्या प्रत्येकाचे नितीन गडकरी यांनी अभिनंदन केले. बाईक निर्मित्ती प्रक्रियेत असलेल्या प्रत्येकाचे टीमवर्क म्हणून गडकरींकडून अभिनंदन करण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे