कुटुंबाला मोफत ३ गॅस सिलिंडर; लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना १५०० दरमहा; राज्य सरकार ची मोठी घोषणा
1 min read
मुंबई दि.२९:- राज्य सरकारचा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे शिंदे सरकारचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी प्रत्येक पात्र कुटुंबाला मोफत तीन गॅस सिलिंडर देण्यात येणार असल्याची घोषणा शिंदे सरकारने केली आहे.
महिलांच्या आरोग्याच्या तक्रारी कमी करायच्या असतील तर सुरक्षित इंधन दिलं पाहिजे. एलपीजी गॅस प्रत्येक घराला देण्यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला तीन गॅस सिलिंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना जाहीर करत आहेत. ५२ लाख १६ हजार ४०० कुटुंबांना लाभ मिळेल.
पर्यावरण संरक्षण केलं जाईल, अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे. लाडकी बहीण योजना स्त्री समाजाचा केंद्रबिंदू होत आहे. महिला कुटुंब आणि अर्थार्जन अशा दोन्ही पातळीवर महिला काम करत आहेत. मुली परीक्षांमध्ये अव्वल असतात.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण घोषित करत आहोत. महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य स्वावलंबणासाठी २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना दर महा १५०० रुपये देणार आहे. या योजनेसाठी दरवर्षी ४६ हजार कोटी देण्यात येईल. जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल, असं म्हणत अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे.
पात्रता • वय 21 ते 60 वर्षे • महाराष्ट्र रहिवासी • विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे, • बँक खाते आवश्यक.
अपात्रता • 2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न • घरात कोणी आयकरदाता असेल * कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर • कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर, – कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर (ट्रॅक्टर सोडून).