२७, २८, २९ जूनला महाराष्ट्रातील ‘या ‘ जिल्ह्यांत पाऊस:- पंजाब डख
1 min read
पुणे दि.२६:- गेल्या काही दिवसात राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आहे. हवामान खात्याने आज बुधवार दि. २६ ही राज्यातील एकोणावीस जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट आणि काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट मिळालेला आहे. दरम्यान जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबरावं डख यांनी 27, 28, 29 आणि 30 जूनला महाराष्ट्रातील काही भागांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
या कालावधीत राज्यातील पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण या भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे, या कालावधीमध्ये राज्यातील नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, परभणी, जालना, बीड, जळगाव, नाशिक, धुळे, अहमदनगर, नंदुरबार, कोकण या भागात चांगल्या पावसाची शक्यता आहे.
विशेष म्हणजे राज्याच्या उर्वरित भागातही या कालावधीत पाऊस पडणार आहे मात्र पावसाचा जोर काहीसा कमी राहणार अशी माहिती पंजाब रावांनी यावेळी दिली आहे.एकंदरीत आठ-दहा दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर महाराष्ट्रात मौसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून 30 जून पर्यंत राज्यात आता पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
जुलै महिन्याबाबत बोलायचं झालं तर पंजाब रावांनी चार जुलै 2024 नंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा चांगल्या जोरदार पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार असा अंदाज यावेळी व्यक्त केला आहे.एकंदरीत जुलै च्या पहिल्या आठवड्यातच महाराष्ट्रात चांगला पाऊस पडणार आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळणार असून पिकांची चांगली जोमदार वाढ होणार अशी आशा व्यक्त होऊ लागली आहे.१२ जून ते २० जून या कालावधी दरम्यान राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा खंड पाहायला मिळाला. ज्या ठिकाणी पावसाचा खंड पडलेला नव्हता तिथेही पावसाचा जोर हा कमी झालेला होता. अगदी हलका पाऊस होत होता.