अहिल्यानगर लाेकसभा मतदारसंघात २५ पैकी २३ उमेदवारांचे डिपाॅझिट जप्त

1 min read

अहिल्यानगर दि.९:- नगर लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयाेगाच्या नियमानुसार काेणत्याही उमेदवाराला १६.६६ मते म्हणजेच डिपाॅझिट वाचवण्यासाठी २ लाख २० हजार ९१२ मतांची आवश्यकता हाेती. मात्र, ती मते न मिळाल्याने एकूण २५ उमेदवारांपैकी २३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.नगर लाेकसभा मतदारसंघात बसपा आणि भाजप हे दाेन राष्ट्रीय पक्ष, तर वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) हे प्रादेशिक पक्ष निवडणुकीच्या रिंगणात हाेते. तसेच ११ पक्ष व दहा नाेंदणीकृत पक्षाचे उमेदवार हाेते. त्यापैकी उमाशंकर यादव, आरती हालदार, कलीराम बहिरू, डॉ. कैलास जाधव, रवींद्र कोठारी, दत्तात्रय वाघमोडे, दिलीप खेडकर, भागवत गायकवाड, मदन सोनवणे, भाऊसाहेब वाबळे. अ‍ॅड. शिवाजीराव डमाळे अमोल पाचुंदकर, गोरख आळेकर, मच्छिंद्र गावडे, गंगाधर कोळेकर, अ‍ॅड. जमीर शेख, नवशाद शेख, प्रवीण दळवी, बिलाल शेख, अ‍ॅड. महेंद्र शिंदे, रावसाहेब काळे, अनिल शेकटकर, सूर्यभान लांबे उमेदवारांचे डिपाॅझिट जप्त झाले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे