आढळराव पाटील यांनी भरला अर्ज; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती

1 min read

पुणे दि.२६:- जोरदार शक्ती – प्रदर्शन करत शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गुरुवारी दि .२५ उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आढळराव पाटील यांचा विजय निश्चित असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.लांडेवाडी येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज, मारुती आणि विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आढळराव यांच्या प्रचारफेरीला सुरुवात झाली. बालगंधर्व रंगमंदिर ते डेक्कन, या दरम्यान जंगली महाराज रस्त्यावर प्रचारफेरी काढण्यात आली. त्यानंतर डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या फेरीची सांगता करण्यात आली. या प्रसंगी,उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,आमदार महेश लांडगे, आमदार दिलीप मोहिते, आमदार अतुल बेनके, आमदार चेतन तुपे, आमदार सुनील टिंगरे. मा.आमदार पोपटराव गावडे, मा.आमदार योगेश टिळेकर, पुणे जिल्हा परिषद मा. अध्यक्ष प्रदीप दादा कंद, शिवसेना उपनेते इरफान सय्यद, मनसे नेते राजेंद्र वागस्कर, जिल्हा परिषद मा. गटनेत्या आशा बुचके, युवा नेत्या पूर्वा दिलीपराव वळसे पाटील, मा.सभापती मंगलदास बांदल, मनसे शहरप्रमुख साईनाथ बाबर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार. अक्षय आढळराव पाटील, अपूर्व आढळराव पाटील, माधुरी आढळराव पाटील, भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे व शिरूर लोकसभा मतदार संघातील महायुतीतील सर्व पक्षांचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे