आढळराव कुटुंबीयांकडे ३९ कोटींची संपत्ती

1 min read

पुणे दि.२६ – शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडे स्थावर व जंगम मालमत्ता मिळून एकूण २६ कोटी ९४ लाख ६९ हजार रुपयांची मालमत्ता आहे, तर पत्नीकडे ११ कोटी ४९ लाख रुपयांची मालमत्ता आहे. आढळराव पाटील यांच्यावर १ कोटी ५१ लाख रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्या कुटुंबीयांकडे एकूण ३९ कोटी ६८ लाखांची मालमत्ता आहे. शपथपत्रात ही माहिती नमूद केली आहे. मालमत्तेचा तपशील वार्षिक उत्पन्न ८० लाख रुपये, व्यवसाय भाडे, पगार, व्यवसाय, जंगम मालमत्ता १२ कोटी. (मुदत ठेवी, शेअर्स, गुंतवणूक, सोने १ हजार ५१३ ग्रॅम, हिरे, चांदी तीन किलो), स्थावर मालमत्ता – २७ कोटी, ६७ लाख (शेतजमीन – चिंचोली, शेवाळवाडी-लांडेवाडी. तर मुंबई येथील घाटकोपर, विक्रोळी आणि शिवाजीनगर येथे एकूण पाच मिळकती), वाहने – बोलेरो, स्विफ्ट, कर्जे – १ कोटी ५१ लाख.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे