शिरूर येथील दरोड्यातील तिसराही आरोपी जेरबंद; दरोडेखोरांच्या हल्यात झाला होता दोघांचा मृत्यू ; साडेसात तोळे लंपास

1 min read

शिरूर दि. ८:- शिरूर तालूक्यातील आरणगाव येथील ठोंबरेवस्ती येथे १८ मार्च २०२३ रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी घरात झोपलेल्या दांपत्याला बेदम मारहाण करत साडेसात तोळे सोन्याचे दागिने लांबवले होते.

तर, या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला असताना यातील दोघा आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले.

तर तिघे फरार असताना आता तिसऱ्या आरोपीला सुद्धा पोलिसांनी जेरबंद केले असून देवा उर्फ पावल्या कैलास काळे, असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे.या बाबत सविस्तर माहिती अशी की, १८ मार्च २०२३ रोजी पहाटे अज्ञात दरोडेखोरांनी शेजारील घरांना कुलूप लावून फुलाबाई ठोंबरे व आनंदा ठोंबरे यांना बेदम मारहाण करून घरातील तब्बल साडेसात तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लांबवले.

तर दरोडेखोरांच्या हल्ल्यात फुलाबाई आनंदा ठोंबरे (वय ६५) व आनंदा सावळेराम ठोंबरे (वय ७०, रा. ठोंबरेवस्ती आरणगाव ता. शिरुर जि. पुणे) या दाम्पत्याचा मृत्यू झाला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना या गुन्ह्यातील आरोपी पारनेर तालुक्यातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने पारनेर व तळेगाव दाभाडे येथून रामदास अशोक काळे व ज्ञानदेव गोपाळ तागड (दोघे रा. रांजणगाव, मस्जिद ता. पारनेर जि. अहिल्यानगर) या दोघांना अटक करत चौकशी केली असता त्यांनी पाच जणांच्या टोळक्याने चक्क एकाच दुचाकीहून येऊन हा गुन्हा केल्याची व दाम्पत्याने प्रतिकार केल्याने मारहाण केल्याचे कबूल केले.

या गुन्ह्यातील तिघा फरार आरोपीचा शोध पोलीस घेत असताना पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस नाईक विकास पाटील, पोलीस शिपाई जयराज देवकर यांनी देवा उर्फ पावल्या कैलास काळे (वय ३५, कडूस, ता. पारनेर, जि. अहमदनगर) याला ताब्यात घेत त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकीदेखील जप्त केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड करत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे