निमगाव सावा गावाला १ कोटी १० लाख रुपयांचा निधी मंजूर
1 min read
निमगाव सावा दि.१५:- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून व आमदार अतुल बेनके यांच्या प्रयत्नातून तसेच पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या पाठपुराव्यातून प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा (ता.जुन्नर) येथील ३ कामांना १ कोटी १० लक्ष रुपये मंजूर झाले आहेत. यामधे निमगाव सावा येथे कुलस्वामी खंडोबा मंदिर रस्ता सुधारणा करणे – ६० लक्ष रुपये, निमगाव सावा येथील कुकडी नदीकाठी श्री पांडुरंग रखुमाई मंदिर सुधारणा करणे – २० लक्ष रुपये तसेच निमगाव सावा येथील कुकडी नदीकाठी श्री भगवान शंकर संत मनाजी बाबा श्री दत्तात्रय व मुक्ताई मंदिर परिसर सुधारणा करणे – ३० लक्ष रुपये या कामांचा समावेश आहे.