समर्थच्या विद्यार्थ्यांचे विभागीय क्रीडा स्पर्धा मध्ये उतुंग यश

1 min read

बेल्हे दि.२४:- इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशन (IEDSSA) मार्फत घेण्यात आलेल्या विभागीय (डी-१ झोन) स्पर्धा नुकत्याच समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे पार पडल्या.

विभागीय ॲथलेटिक्स स्पर्धेत समर्थ पॉलिटेक्निक च्या नेहा दरेकर हिने २०० मीटर,४०० मीटर,८०० मीटर धावणे या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला.
लांब उडी- प्रथम क्रमांक-श्रावणी दुरगुडे (समर्थ पॉलीटेक्निक) गोळाफेक- प्रथम क्रमांक-आकांक्षा गावडे (समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी) गोळा फेक आणि भालाफेक द्वितीय क्रमांक-चारू मुळे (समर्थ पॉलीटेक्निक)

रीले ४ x १०० मीटर (मुली) द्वितीय क्रमांक-आकांक्षा मुळे,निकिता वाळुंज,ऋतुजा हुंडारे,तनुजा थोरात व श्रावणी दुरगुडे (समर्थ पॉलिटेक्निक) रीले ४ x ४००मिटर (मुली) प्रथम क्रमांक-आकांक्षा मुळे,निकिता वाळुंज,ऋतुजा हुंडारे,तनुजा थोरात,श्रावणी दुरगुडे,साक्षी पळसकर,नेहा दरेकर (समर्थ पॉलिटेक्निक द्वितीय क्रमांक-अवंतिका गोफणे,पायल कीठे, साक्षी पवार,प्राची म्हस्के (समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी)

उंच उडी(मुले) प्रथम क्रमांक -साहिल जाधव (समर्थ पॉलीटेक्निक) तिहेरी उडी(मुले) द्वितीय क्रमांक-अर्शद शेख (समर्थ पॉलिटेक्निक) भालाफेक (मुले) द्वितीय क्रमांक-रमीझराजा शेख (समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी) रीले ४ x १०० मीटर (मुले) द्वितीय क्रमांक-सोहम शिंदे (समर्थ पॉलिटेक्निक)

रीले ४ x ४०० मीटर (मुले) प्रथम क्रमांक-रोहन बोऱ्हाडे (समर्थ पॉलिटेक्निक) तसेच इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशन (IEDSSA) मार्फत घेण्यात आलेल्या विभागीय खो-खो (डी-१ झोन) स्पर्धा नुकत्याच कुरण येथे पार पडल्या.त्यामध्ये समर्थ पॉलिटेक्निकच्या मुलींच्या संघाने रोमहर्षक विजय मिळवत अव्वल क्रमांक मिळवला.तर समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चा संघ उपविजेता ठरला.

त्याचप्रमाणे समर्थ पॉलिटेक्निक मुलींचा व्हॉलीबॉल संघ विभागीय (डी-१ झोन) स्पर्धेमध्ये अव्वल ठरला.विजयी झालेल्या दोन्ही संघांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याची माहिती प्राचार्य अनिल कपिले यांनी दिली.


इंडियन फार्मासुटिकल असोसिएशन ने आळे येथे आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी च्या मुलांच्या खो-खो संघाने प्रथम क्रमांक मिळविल्याची माहिती प्राचार्य डॉ. बसवराज हतपक्की यांनी दिली.समर्थ गुरुकुल ची विद्यार्थिनी सृष्टी भांबेरे हिची सांगली येथे झालेल्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड झाल्याची माहिती प्राचार्य सतिश कुऱ्हे यांनी दिली.


स्पर्धा ही खिलाडू वृत्तीने निकोप आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडण्यासाठी विद्यार्थ्यांनी संयमी वृत्ती अंगीकारावी.स्पर्धेमुळे शारीरिक,मानसिक विकास होतो.स्पर्धा ही मनाची एकाग्रता आणि चपळता वाढवण्यास मदत करते.नियमित व्यायाम व योगा हेच चांगल्या खेळामागचे गमक आहे असे समर्थ शैक्षणिक संकुलाचे क्रीडा संचालक प्रा.एच पी नरसुडे म्हणाले.


क्रीडा शिक्षक डॉ.राजाभाऊ ढोबळे, प्रा.किरण वाघ, प्रा.ज्ञानेश्वर जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,समर्थ पॉलिटेक्निकचे प्राचार्य अनिल कपिले,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. बसवराज हातपक्की,

समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,टेक्निकल डायरेक्टर डॉ.चंद्रशेखर घुले,क्रीडा संचालक एच पी नरसुडे,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे