रेसर बाईक चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक,१० रेसर बाईक जप्त; राजुर पोलीसांची कामगिरी
1 min read
राजूर दि.१८:- रेसर बाईक चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक करून 10 रेसर बाईक जप्त करुन 10 लाख 80 हजार रु. किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात राजुर पोलीसांना यश आले आहे.या बाबत सविस्तर माहिती अशी की, नगर जिल्ह्यातील राजुर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 427/2023 भा.द.वी. कलम 379 प्रमाणे शेंडी येथुन अज्ञात इसमांनी अंदाजे 1,50,000/ रु. किमतीची बुलेट चोरीला गेले.
बाबत तसेच दि. 09/12/2023 रोजी राजुर पोस्टे गु.र.नं. 417/2023 भा.द.वी. कलम 379 प्रमाणे राजुर येथुन अंदाजे 1,30,000/- रु. किमतीची बुलेट मोटार सायकल चोरी गेले बाबत गुन्हे दाखल झाले होते. सोमनाथ वाघचौरे (उपविभागीय पोलीस अधिकारी) संगमनेर उपविभाग यांनी
सदर पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेवुन सहा. पोलीस निरीक्षक दिपक सरोदे यांना सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणेकामी व गुन्ह्यातील गेला माल मिळणेबाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये सपोनि / दिपक सरोदे यांनी घटनास्थळी भेटी देवुन गुन्हा करण्याची कार्यपद्धती पाहुन सदर ठिकाणचे शेंडो गावातील व राजुर गावातील सी.सी.टी.व्ही. फुटेज व गोपनीय बातमी दाराने दिलेल्या खात्रीलायक माहिती वरुन
सदर गुन्ह्याचा तपास करणे करिता पोलीस स्टाफसह दि. 15/02/2024 रोजी घोटी, ता. इगतपुरी येथे रवाना होवुन सदर गुन्ह्यातील संशयीत इसम नामे शंकर एकनाथ गांगड रा. उभाडे. ता. इगतपुरी यास ताब्यात घेवुन त्यास गुन्ह्यातील गेले
मालाबाबत सखोल चौकशी करता त्याने राजुर व शेंडी येथील दोन बुलेट मो.सा. त्याचे साथीदारां सोबत येवुन चोरी केल्याबाबत माहिती दिली. त्यावरुन सदर गुन्ह्यातील दोन्ही बुलेट मोटार सायकल सदर आरोपी याचे ताब्यातुन जप्त करण्यात आल्या.
तसेच आरोपी यास अधिक विश्वासात घेवुन त्याचेकडे इतर चोरी केलेल्या मोटार सायकली बाबत विचारपुस करता त्याने इतर पोस्टे हद्दीत मोटार सायकल चोरी केले बाबत माहिती दिली. त्याचे ताब्यातुन खालील 10 रेसर मोटार सायकली असा एकुण 10,80,000/- रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आल्या.
सदरची कारवाई राकेश ओला सो. पोलीस अधिक्षक अहमदनगर, वैभव कलुबर्म (अप्पर पोलीस अधिक्षक), श्रीरामपुर व सोमनाथ वाघचौरे (उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर विभाग) यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली राजुर पोलीस स्टेशनचे अधिकारी सपोनि दिपक सरोदे, पोलीस उपनिरीक्षक शेख व पोलीस कर्मचारी – पोहेकाँ/
अल्ताफ शेख, पोहेकाँ/विजय मुंढे, पोहेकाँ/कैलास नेहे, मपोहेका/सुवर्णा शिंदे, पोना/ दिलीप डगळे, पोकाँ/अशोक गाढे, पोकाँ/ विजय फटांगरे, पोकाँ/मनोहर मोरे, पोकाँ/सचिन शिंदे, पोकाँ/ अशोक काळे, चापोहेकाँ/अशोक तांबे, पोकाँ/कोकणे, पोकाँ/फिरोज इनामदार, मपोना/ रोहिणी वाडेकर, अपर पोलीस अधिक्षक कार्यालय श्रीरामपुर येथील सायबर सेल नेमणुकीचे पोना/संतोष दरेकर, पोना/सचिन धनाड, पोना/रामेश्वर वेताळ यांनी केली आहे.