उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार; माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या अंत्यविधीला राहणार उपस्थित
1 min read
नारायणगाव दि.१२:- जुन्नर तालुक्याचे माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या अंत्यविधीसाठी हिवरे येथे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित राहणार आहेत. शरद पवार हे दुपारी 3 वाजता विघ्नहर कारखाना येथील हेलिपॅड वर येणार आहेत तेथून थेट हिवरे येथे जाणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे ग्रामोन्नती मंडळाचे कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे २ वाजता येणार आहेत तसेच ते श्री विघ्नहर गणपती देवस्थान भक्त निवास ओझर येथे थांबून हिवरे बुद्रुक येथे साडेतीन वाजता पोहोचणार आहेत.
माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या निधनाने तालुक्यावर शोककळा पसरली आहे. दुपारी ४ वा हिवरे बुद्रुक (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे त्यांचा अंत्यविधी होणार आहे.