एक केस तोडल्याने इतर काळे केसही पांढरे होतात? जाणून घ्या यामागचं सत्य
1 min readजुन्नर दि.२९ :- एक पांढरा केस तोडल्यानंतर अनेक केस पांढरे होतात का असा प्रश्न प्रत्येकालाच अगदी सहजपणे पडतो. मात्र आता ही गोष्ट कितपत सत्य आहे हे आपण जाणून घेणार आहोत. डॉक्टरांच्या मते, वयाच्या आधी केस पांढरे होण्यामागचे कारण म्हणजे तुमची अस्वस्थ जीवनशैली, पोट साफ न होणे हे आहे.
या संदर्भात डर्मटोलॉजिस्टचं असं म्हणणं आहे की, तुम्ही एक पांढरा केस तोडला की तुमचे इतरही काळे केस पांढरे होऊ लागतात या गोष्टीत कोणतेही तथ्य नाहीये. हा पूर्णपणे चुकीचा गैरसमज आहे. केसांच्या रंगाचे खास केमिकल हे मेलेनिन असते.
तुमच्या केसांतील मेलेनिन कमी झाल्यानंतर तुमचे केस पांढरे होऊ लागतात. याच कारणामुळे काळे केस पांढरे होऊ लागतात. मेलेनिन अनेक कारणांमुळे कमी होऊ शकते. एक पांढरा केस तुटल्याने मेलेनिनवर फारसा फरक पडत नाही.
एक पांढरा केस तोडल्याने त्याच जागी पुन्हा पांढरा केस येऊ लागतो. तुमच्या माहितीसाठी फॉलिकलमुळे एकच केस पांढरा येतो. जोपर्यंत पिगमेंट सेल पूर्णपणे डेड नाही होत तोपर्यंत केस पांढरे होत नाहीत.