२२ जानेवारीला गावोगावी चिकन,मच्छी, मटण, दारू विक्रीला बंदी

1 min read

जुन्नर दि.१९:- जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील सर्व ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतच्या हद्दीत 22 जानेवारी रोजी मटन, चिकन, मच्छी, दारू किक्री बंदी करण्याचे आवाहन केले आहे. सदर पत्र सर्व ग्रामपंचायतीने दिले असून त्या पत्रात म्हटले आहे की, ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व मटण, चिकन, मच्छी विक्रेत्यांना तसेच देशी व विदेशी मद्य (दारू) विक्री मालकांना कळविण्यात येते की. श्री क्षेत्र अयोध्या धाम येथे श्री राम मुर्ती प्राणप्रतिष्ठा उत्सव सोमवार दिनांक २२/०१/२०२४ रोजी होणार असल्याने आपले गावात कोणत्याही प्रकारचे मटण, चिकन व मच्छी तसेच देशी विदेशी मद्य (दारू) विक्री करण्यासाठी बंदी केली आहे. आपण आपली मटण, चिकन, मच्छी विक्री दुकाने, मासांहारी हॉटेल अथवा ढाबा, मासांहार खानावळ, देशी विदेशी मद्य (दारू) दुकाने मालकांनी कोणत्याही प्रकारे सुरू नठेवता संपूर्ण बंद ठेवावी. सर्व विक्रेत्यांनी, दुकान धारकांनी ह्या सूचनेची दखल घेऊन श्री राम उत्सव व ग्रामपंचायत ला सहकार्य करावे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे