आळेफाटा येथील धांडे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे गुरुवारी महाआरोग्य मोफत तपासणी शिबीर

1 min read

आळेफाटा दि.१६:- पिंपरी-चिंचवड, पुणे येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आता आपल्या आळेफाटा (ता.जुन्नर) येथे डॉ. डी. वाय. पाटील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल (युनिट ऑफ डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर-पिंपरी पुणे) आयोजित महाआरोग्य तपासणी शिबीर गुरुवार दि.१८ जानेवारी रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ३.३० या वेळेत आता येथील धांडे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे संपन्न होणार असून. या शिबिरातखालील आजारांवर मोफत तपासणी व माफक दरात उपचार करण्यात येणार आहेत.१) अस्थिरोग :-संधिवात, हातापायांवर येणारी सूज, जुनाट हाडांचे विकार इ.२) हृदयरोग व मधुमेह :-उच्च रक्तदाब, दमा, जुनाट सर्दी, अनियंत्रित साखरेचे प्रमाण, जुनाट हदयाचे विकार इ.३) स्त्रीरोग :-मूल न होणे, मासिक पाळीच्या समस्या, गर्भपिशवीचे आजार, वजन वाढणे, हिमोग्लोबिन इ. ४) मेंदू व मणक्याचे आजार :- मेंदूमध्ये झालेली गाठ, अकस्मात गिरकी येणे, अर्धांगवायू इ.५) किडनीचे आजार : वारंवार होणारा मूतखडा, प्रोस्टेट ग्रंथींची वाढ होणे, अंडाशयावर येणारी सूज इ.६) शस्त्रक्रिया :अंगावर गाठी येणे, अपेंडीक्स, हर्निया, पोटात वाढलेली गाठ इ.या शिबीराची वैशिष्ट्ये खालील वैशिष्टे आहेत.१) तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व मार्गदर्शन
२) मोफत तपासण्या : ई.सी.जी., हिमोग्लोबिन, शुगर, कोलेस्टेरॉल, युरिया, शरिरातील ऑक्सिजनचे प्रमाण इ. ३) गरजू रुग्णांसाठी माफक दरात शस्त्रक्रिया, सोनोग्राफी, अँजिओग्राफी व सिटीस्कॅन या साठी विशेष सहकार्य अनंतराव कणसे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, सुर्या अकॅडमी,शिवमुद्रा प्रतिष्ठान,काव्या हॉटेल आळेफाटा यांचं मोलाचं सहकार्य लाभल आहे. यासाठी ९२२६८४२९०१/७०२०९२५७५८ या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे