मासिक पाळी दरम्यान पिंपल्स येतात? काय आहे त्यामागचं कारण?
1 min read
पुणे दि .१४:- आजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांचं महिन्याचं सायकल पूर्णपणे बदलतं. अशात मासिक पाळी दरम्यान अनेक समस्या जाणवतात. काही महिलांना मासिक पाळीदरम्यान पिंपल्स येतात. होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे आणि फास्टफूडमुळे देखील मासिक पाळीवर फरक पडतो. मासिक पाळी सुरू होण्याच्या 7 ते 10 दिवस आधी चेहऱ्यावर पिंपल्स येऊ लागतात आणि मासिक पाळी सुरू होताच आपोआप जातात. मात्र यामागे एक कारण आहे.
मासिक पाळी दरम्यान शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी कमी होते आणि टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी वाढू लागते, ज्यामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये सेबम तयार होण्यास सुरुवात होते आणि त्वचा तेलकट होते आणि चेहऱ्यावर पिंपल्स येतात.
मात्र चेहऱ्यावर पिंपल्स येत असल्यास दिवसातून दोन ते तीन वेळा फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवा. तसेच मासिक पाळी दरम्यान कॉस्मेटिक, सनस्क्रीन आणि इतर सौंदर्य प्रसाधनांचा वापर करणं टाळावेत. तसेच यादरम्यान साखर, मैदा किंवा इतर प्रोसेस्ड फूड खाणे टाळावे.