22 जानेवारीला घराघरात दीपोत्सव साजरा करा; अयोध्येतून PM नरेंद्र मोदींचं आवाहन

1 min read

अयोध्या दि.३०:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उत्तर प्रदेशच्या अयोध्या रेल्वे स्टेशनचं लोकार्पण केलं. तसेच यावेळी वंदे भारत आणि अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. याच लोकार्पण सोहळ्यातील कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना संबोधित केलं. तसेच 140 कोटी लोकांनी 22 जानेवारीला घराघरात दीपोत्सव साजरा करा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लोकांना केलं आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी 22 जानेवारीला अयोध्या येथे येऊ नका असं आवाहन केलं आहे. ‘प्रत्येकाची इच्छा आहे की 22 जानेवारीला लोकार्पण सोहळ्याला यावं. पण प्रत्येकाला कार्यक्रमाला येणे शक्य नाही. रामभक्तांना विनंती आहे की 22 जानेवारीला मंदिरात विधीचा कार्यक्रम झाल्यानंतर तुमच्या सोयीनुसार राम मंदिरात या. पण 22 जानेवारी कार्यक्रमासाठी येऊ नका, असं आवाहान मोदींनी केलं.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे