पुढील 48 तासांत जोरदार पावसाची शक्यता! ‘या’ तीन जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

1 min read

पुणे दि.२५:- राज्यात पुढील 48 तासांत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील 48 तासांत मुंबई , ठाणे सह, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.

भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. मुंबईत 25 आणि 26 नोव्हेंबरला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाने मुंबईत अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. तर मुंबईत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

तसेच पावसानंतर शहरातील हवेच्या गुणवत्तेत आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेलं चक्रीवादळ आणि वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यासह देशाच्या हवामानात मोठा बदल झाला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे