राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता; राज्यात शुक्रवार पासूनच ढगाळ वातावरण

1 min read

मुंबई दि.२२:- अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम देशभरासह राज्यात देखील जाणवू लागला आहे. वातावरण बदलामुळे पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणातील काही भागात पावसाची शक्यता आहे.महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहेत.

पंजाब डंख यांनी नवीन हवामान अंदाज जाहीर केला आहे, त्यांच्या म्हणण्या नुसार राज्यामध्ये 25 नोव्हेंबर, 26 नोव्हेंबर, 27 नोव्हेंबर ला पाऊस येण्याची शक्यता आहे. असा अंदाज आहे. राज्यामध्ये 25 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबेर दरम्यान विदर्भाचा काही भाग, मराठवाड्याचा काही भाग, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, कोकणपट्टि भागात पाऊस येणार आहे.

सध्या येणार पाऊस हा अवकळी पाऊस आहे, तो सगळीकडे पडणार नाही, तर राज्यात तुरळक ठिकाणी पडणार आहे. राज्यात 25 नोव्हेंबेर पासून बऱ्याचशा ठिकाणी पाऊस पडणार आहे.

राज्यात 24 नोव्हेंबर पासूनच ढगाळ वातावरण दिसायला लागेल. राज्यातील उर्वरील भागामध्ये हवामान कोरडे राहील तसेच ढगाळ वातावरण राहील.एकंदरीत राज्यामध्ये 24 नोव्हेंबर पासून ते 27 नोव्हेंबर पर्यंत ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे